परशराम साबळे यांना इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

परशराम साबळे यांना इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन पुरस्कार प्रदान

कोपरगाव  प्रतिनिधी-   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  कोपरगाव  येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळ...

कोपरगाव  प्रतिनिधी-  



शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  कोपरगाव  येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांना इलाइट प्रॉडक्शन व एन.इ.एस. डी. एम फाऊंडेशन यांच्या वतीने इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.



 कोपरगाव येथील रहिवाशी असलेले साबळे यांची घरची परिस्थिती अत्यंत हालकीची  असल्याने  शिक्षणासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली ती धडपड समाजातील इतरांना करावी लागू नये या हेतूने २००५ साली ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करत भारत सरकार व महाराष्ट्र  शासनाची मान्यता घेत विविध  अभ्यासक्रम सुरू केले, तसेच ग्रामिण भागातील मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबातील मुलांना इंग्रजी भाषा यावी म्हणून शासन मान्य इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करत हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविले. तसेच कोरोनाच्या काळात संस्थेच्या माध्यमातून मास्क, सॅनिटायझर, फरसाण आदी वस्तूचे गरजुना वाटप केले. या त्यांचा कार्य मुळे साबळे यांचा लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच मुंबईच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१५ साली विशेष गौरव केला आहे. आतंरराष्ट्रीय ह्यूमन राईट मिशनच्या वतीने साबळे यांची विश्व शांती दूत म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय शिक्षणतज्ज्ञ या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.


या कार्याची दाखल घेत  आग्रा येथे  झालेल्या  कार्यक्रमात  साबळे यांना इलाइट  इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन  पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या शुभेच्छा संदेशाने सुरुवात होऊन  प्रसिध्द सौंदर्यवती उर्फी जावेद,शम्मीसिंग राजपूत, इलाइट प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूप्रताप तिवारी, एन. इ.एस. डी. एम फाऊंडेशनचे संचालक सुनील कुमार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 


साबळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, संस्थेचे सचिव सुचित्रा साबळे, प्राचार्य विशाल धारणगावकर, प्राचार्य विजय जाधव, रजिस्टर बापूसाहेब डांगे, राजेंद्र आहेर,विलास चव्हाण, सोनाली कापसे यांच्यासह बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक जुनियर कॉलेज, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल आदी संस्थेच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत