अनिरुद्ध काळेंच्या मागणीवरून वीज रोहित्राची पाहणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अनिरुद्ध काळेंच्या मागणीवरून वीज रोहित्राची पाहणी

  कोपरगाव प्रतिनिधी  यावर्षीचा उन्हाळा मागील ११४ वर्षातील अत्यंत उष्ण उन्हाळा म्हणून नोंदविला गेला आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव शहरातील सुभद्...

 कोपरगाव प्रतिनिधी 



यावर्षीचा उन्हाळा मागील ११४ वर्षातील अत्यंत उष्ण उन्हाळा म्हणून नोंदविला गेला आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरातील वीज रोहित्रावरून वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत समाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध काळे यांनी वारंवार वीज प्रवाह खंडीत होत असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्याची दखल घेवून नुकतीच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुभद्रानगरच्या वीज रोहित्राची पाहणी केली आहे. 


सुभद्रानगरच्या वीज रोहित्रात सातत्याने बिघाड होत असल्यामुळे या रोहित्रावर अवलंबून असणारा वीजपुरवठा दिवसा, रात्री-अपरात्री खंडीत होत होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करतांना नाकी नऊ येत होते. या रोहित्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक नागरिकांनी महावितरणकडे तक्रार करून देखील उपयोग होत नव्हता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध काळेंनी सबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांना नियमित पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा यासाठी सुभद्रानगरच्या वीज रोहित्रामध्ये वारंवार होणारा बिघाड कशामुळे होतो याची माहीती घेवून या वीज रोहित्राची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुभद्रा नगरच्या वीज रोहित्राची पाहणी करून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची ग्वाही समाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध काळे यांना दिली आहे. 


यावेळी सहाय्यक अभियंता अतुल खंदारे, सहाय्यक लेखापाल प्रमोद जाधव. अनिरुध्द काळे, आनंद डीके , आशिष राजपाल, अशोक सोनावने, बापुसाहेब ईनामके, अंकुश लासनकर,ओम जोशी, नेरे साहेब,प्रथमेश टेके, अजित ईनामके व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत