संक्रापूर येथे ह.भ.प दाते महाराजांच्या अभिष्टचिंतनानिमित्त जपअनुष्ठान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संक्रापूर येथे ह.भ.प दाते महाराजांच्या अभिष्टचिंतनानिमित्त जपअनुष्ठान सोहळा

आंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या संक्रापूर येथे परमपूज्य श्री. १०८ महंत सोमेश्वरनंदगिरीजी महाराज य...

आंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या संक्रापूर येथे परमपूज्य श्री. १०८ महंत सोमेश्वरनंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत ह.भ.प श्री सद्गुरू रामदास महाराज दाते आण्णा यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य जपअनुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


या कार्यक्रमासाठी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा  संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जेष्ठ नेते इंद्रभान थोरात आदी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.


मंगळवार दि. २४ मे पासून ते शुक्रवार दि. २७ मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  याप्रसंगी ह.भ.प संजय महाराज व्हसाळे, ह.भ.प शांताराम महाराज शिंदे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तमणर, ह.भ.प समाधान महाराज बोंबले, ह.भ.प अमोल महाराज पिसे, ह.भ.प बापूसाहेब महाराज चिंधे, ह.भ.प मच्छिंद्र महाराज चोरमले यांच्या दृकश्राव्य वाणीतून सकाळ, संध्याकाळ प्रवचन होणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीत अबालवृद्ध भक्तगणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा डीआरडी सदस्त बापूसाहेब वडितके, तुषार चिंधे, सुभाष दाते, सोहम चिंधे, भजनी मंडळ, संक्रापूर ग्रामस्थ, संयोजक व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत