श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील धर्मगुरु श्री. पाळख सचिन चक्रनारायण यांच्यावर दाखल केले गेलेले खोटे गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास आरप...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील धर्मगुरु श्री. पाळख सचिन चक्रनारायण यांच्यावर दाखल केले गेलेले खोटे गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास आरपीआय आंबेडकर गटाच्यावतीने आंदोलन छेडू असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी श्रीरामपुर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदनाद्वारे दिला आहे
या निवेदनात म्हंटले की, १३ ते ३० एप्रिल 30/4/2022 या कालावधीत श्री.सुपरीटेडन्ट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कौसिल चर्च, आदर्शनगर श्रीरामपुर येथे जो निंदणीय प्रकार घडला तो समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे. त्यामध्ये धर्मगुरू श्री. पाळख सचिन चक्रनारायण यांचेवर खोटे नोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे व ज्यांच्यामुळे हा प्रकार घडला ते विवेक दिंडोरकर, सांताक्रुझ पुर्व विदयानगरी मुंबई,याकोब वडागळे, महाड कॉलनी, औरंगाबाद,रमेश ढाले, हेंद्रेपाडा, बदलापुर वेस्ट,रमेश ढाले, हेंद्रेपाडा, बदलापुर वेस्ट,दत्ता अमोलिक, गंगानगर, नेवासा, मनिष एस. पगारे, दत्ता चौक, नाशिक,रेव्ह. व्हि.टी. अब्राहम,रेव्ह पॉल धंगय्या, रेव्ह. के. जे. मँथ्यू, रेव्ह. टी. सत्यनेशन,रेव्ह. टिमोथी राव योसेफ वडागळे, अशोकनगर, श्रीरामपुर, विश्वरजन मकासरे, श्रीरामपुर,कांबळे, श्रीरामपुर,अभिजित केदारी, संगमनेर या सर्व अनाधिकृत संस्थेच्या लोकांना ताब्यात घेवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावेत.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तातडीने लक्ष घालून सदरबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, फ्रान्सिस साळवे, ख्रिस्ती धर्मगुरू सचिन चक्रनारायण, संतोष शेळके, राहुल भोसले, सविता शेळके ,सोनाली देठे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत