कोपरगाव(वेबटीम) विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, एलमवाडी, चितळी, जळगाव आदी गावातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या लाभ...
कोपरगाव(वेबटीम)
विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, एलमवाडी, चितळी, जळगाव आदी गावातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.
ना. आशुतोष काळे सोमवार रोजी राहाता तालुक्यात निळवंडे कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या राहाता संपर्क कार्यालयात त्यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना धनादेश देण्यात आले. यामध्ये पुणतांबा येथील श्रीमती ताराबाई बाळासाहेब आहिरे, श्रीमती दिपाली गौतम गायकवाड, श्रीमती उज्वला नितीन जोगदंड, श्रीमती सोना छबु थोरात,श्रीमती वैशाली राम भालेराव, श्रीमती मंगल संजय इंगळे, श्रीमती सुमन सुरेश थोरात, एलमवाडी येथील श्रीमती बालिकाबाई बाळासाहेब मुसकवाड, श्रीमती अमिना रज्जाक शेख, प्रवीण बाबासाहेब तांबे चितळी येथील श्रीमती रेखा विजय कुऱ्हाडे, व जळगाव येथील शानुर दिलीप शेख अशा एकूण १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० याप्रमाणे २ लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे, नपावाडीचे उपसरपंच राजेंद्र धनवटे, गुलशेर शेख, संजय धनवटे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत