शिक्षक बँकेंच्या स्वच्छ कारभारासाठी गुरुजींची गुरुमाऊलीच पात्र; सभासदांचा सूर! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षक बँकेंच्या स्वच्छ कारभारासाठी गुरुजींची गुरुमाऊलीच पात्र; सभासदांचा सूर!

नगर ः  वेबटीम      विश्वास आणि पारदर्शी कारभार म्हटलं तर ‘रोहोकले गुरुजींचे नाव सर्वसामान्य शिक्षक सभासदांमधून आदराने घेतले जाते. त्यामुळेच ...


नगर ः  वेबटीम   


 विश्वास आणि पारदर्शी कारभार म्हटलं तर ‘रोहोकले गुरुजींचे नाव सर्वसामान्य शिक्षक सभासदांमधून आदराने घेतले जाते. त्यामुळेच बँकेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच 14 तालुक्यांतून गुरुजींच्या गुरुमाऊलीला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता येणारी निवडणूक ही शिक्षक सभासदांनीच हातात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे

शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे. त्याकरीता सर्वच मंडळांकडून जोरदार प्रचारही सुरू झाला आहे. मात्र, यात रावसाहेब रोहोकले गुरुजींच्या मार्गदर्शनात प्रविण ठुबे, विकास डावखरे आदींनी जिल्ह्याभरातील  नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून झंझावाती दौरे सुरू केले आहेत. राहुरी विद्यापीठात झालेली कार्यकर्त्यांची कार्यशाळा ही गुरुजींच्या गुरुमाऊलीच्या विजयाचे शुभसंकेत समजले जात आहे. त्या कार्यशाळेच्या खर्चासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तनमनधनाने योगदान दिले आहे. अनेकांनी पदरमोड करून गुरुजींना ताकद देण्याचे काम केले आहे. स्वयंस्फुर्तीतून मिळणारा हा प्रतिसाद पाहता गुरुजींच्या गुरुमाऊलीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. 

 शिक्षकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी विश्वासाने ठेवलेली शिक्षक बँक चांगल्या प्रकारे चालावी, अशी सर्वच सभासदांची इच्छा आहे. त्यासाठी बँकेवर पारदर्शी, काटकसरीने कारभार करणारे सत्ताधारी मंडळ असावे, अशीही धारणा आहे. शिक्षक बांधवांच्या पैशांचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी विश्वासास पात्र ठरणारे मंडळ असावे, अशीच सभासदांची सदिच्छा आहे. त्यामुळेच या निवडणुकीत गुरुजींशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही, असे आता सभासदच बोलू लागले आहेत.

 गुरुजींच्या मार्गदर्शनात सर्व तालुक्यांतील शिक्षक बांधव हे सत्ताधार्‍यांना   बँकेच्या सत्तेतून दूर करण्यासाठी ऐतिहासिक ‘क्रांती’ला तयार झालेले आहेत. अनेक छोट्या मोठ्या संघटनाही गुरुजींच्या वर्गात धडे घेण्यासाठी उत्सूक आहेत. त्यामुळेच एकूणच सध्या दिसणारे हे चित्र सत्ताधार्‍यांची झोप उडवणारे तर गुरुजींसाठी मात्र ‘ऑल ईज वेल’ असेच ठरणारे दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत