देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव/ऋषि राऊत):- देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत देवळाली प्रवरा विकास मंडळाच्या उमेदवारांनी...
देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव/ऋषि राऊत):-
देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत देवळाली प्रवरा विकास मंडळाच्या उमेदवारांनी १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता अबाधित राखण्यास यश मिळवले आहे. तर विरोधी लोकसेवा मंडळाच्या परिवर्तन करण्याच्या मनसुब्यांना सभासदांनी सफशेल नकार दिला आहे.
नगर जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी संस्थेच्या मंगल कार्यालय मध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
शांततेत सुरुवात झालेल्या मतदान प्रक्रियेचा सर्व सभासदांनी आदर राखत शेवटपर्यंत किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता कोणतेही गालबोट लागू दिले नाही. सकाळी ११ पर्यंत ३४ टक्के, १ पर्यंत ६७ टक्के तर ३ पर्यंत ८५ टक्के मतदान झाले. तर ४ वाजेपर्यंत म्हणजेज मतदान संपेपर्यंत ९० टक्के मतदान झाले.एकूण २४१० मतदारांपैकी २१६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
लोकसेवा मंडळ व विकास मंडळाच्या उमेदवारांनी सकाळी ८ पासूनच मंगल कार्यालयाच्या बाहेर उभे राहून येणाऱ्या मतदाराला सभासदाला अभिवादन करण्यास सुरुवात केली होती.
या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे सुपुत्र सत्यजित कदम यांनी विकास मंडळाची धुरा सांभाळली होती. विरोधी लोकसेवा मंडळाला अजित कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, गणेश भांड, सुरेंद्र थोरात, सुनील कराळे यांचे नेतृत्व लाभले होते.
सत्ताधारी मंडळींनी जुन्या-नव्याचा मेळ घालत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला सभासदांनी विरोधकांना बाजूला ठेवत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
मतदान नंतर विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, प्रीतीताई कदम, प्रकाश संसारे, सचिन ढुस, गोरख मुसमाडे, मुरलीधर कदम, धोंडिभाऊ मुसमाडे, केरू पटारे, अनंत कदम, वसंत कदम, अजित चव्हाण, भारत शेटे, सचिन शेटे, प्रशांत मुसमाडे, विशाल मुसमाडे, किशोर गडाख, संदीप कदम, अमोल कदम, सुधाकर कदम, मोहसिन शेख, सचिन कोठुळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सभासदांनी माजी आमदार चंद्रशेखर कदम व सत्यजीत कदम यांच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ ठरणार असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली.
विकास मंडळाचे सर्व १२ उमेदवार विजयी
सर्वसाधारण मतदारसंघ
कदम नानासाहेब बाबुराव - 716
कदम शहाजी ठकाजी - 1120 विजयी
खुरुद बाळासाहेब जगन्नाथ - 937
गडाख सुर्यभान कृष्णाजी - 1129 विजयी
चव्हाण शरद विश्वनाथ - 772
चव्हाण संतोष जगन्नाथ - 1233 विजयी
ढुस अरुण कोंडीराम - 880
ढुस राजेंद्र विठ्ठल - 1203 विजयी
पठारे नानासाहेब सखाराम - 898
भांड बाळासाहेब जगन्नाथ - 885
भांड सुदाम जगन्नाथ - 1221 - विजयी
मुसमाडे उत्तम काशिनाथ- 1145 - विजयी
मुसमाडे कृष्णा नानासाहेब- 860
वरखडे मंजाबापू सावित्रा - 1143 - विजयी
शेटे बाबासाहेब जगन्नाथ- 1181 - विजयी
शेटे हिराबाई भास्कर- 720
महिला राखीव
कदम सुमन सुर्यभान - 799
कदम स्वरूपा अभिजित - 1320 विजयी
कराळे निर्मला दत्तात्रय - 812
वाळुंज संगीता भाऊसाहेब - 1332 विजयी
अनुसूचित जाती
पंडित राजेंद्र पावलस - 1253 विजयी
संसारे बाबासाहेब प्रभाकर - 884
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
मुसमाडे दिलीप सोपान - विजयी
मुसमाडे भागवत लक्ष्मण -
भटक्या विमुक्त
टीक्कल सुधीर विठ्ठल (विजयी)
बिनविरोध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत