नगर ः वेबटीम कर्जफेड करण्यात अयशस्वी ठरलेला डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्वार चालविण्यास देण्याचा प्रस्ताव अखेर जिल्हा बँकेने राज्य सरकारक...
नगर ः वेबटीम
कर्जफेड करण्यात अयशस्वी ठरलेला डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्वार चालविण्यास देण्याचा प्रस्ताव अखेर जिल्हा बँकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा 12 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या सभेत कर्जवसुलीसाठी कारखाना ताब्यात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र ताबा न मिळाल्याने अखेर जिल्हाधिकार्यांकडे दाद मागण्यात आली होती. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक आले होते. 28 जुलै 2015 रोजी तत्कालिन प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांनी कारखान्याची देवळाली प्रवरा, बेलापूर आणि चिंचविहीरे येथील जमीन विकून कर्ज वसूली करण्याचे आदेश दिले होते. मात्र ती विक्री होऊ शकली नाही. 24 एप्रिल 2017 रोजी राहुरी तहसीलदारांनी कारखान्यातील सर्व मालमत्तेचा ताबा घेऊन ती बँकेकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर खासदार सुजय विखे यांनी हा कारखाना चालविण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी जिल्हा बँकेचे कारखान्याकडे 92 कोटींचे कर्ज होते. हे कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने पूर्नगठण करताना 10 हप्ते पाडून दिले. मात्र या चार पाच वर्षात कारखान्याकडून वेळेत हप्ते भरले गेले नाही.त्यामुळे थकबाकी आता 105 कोटींवर गेली आहे. कर्जाची वसूली होत नसल्याने अखेर बँकेने हा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. 28 जूनला बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत