सात्रळ(वेबटीम) राहुरी तालुक्यातील सोनगांव येथे कृषिकन्यांचे आगमन झाले असून सोनगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागत...
सात्रळ(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील सोनगांव येथे कृषिकन्यांचे आगमन झाले असून सोनगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागत केले .
नेवासा तालुक्यातील भानस हिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालयातील या विद्यार्थिनी आहेत .ग्रामीण भागातील शेती दुग्ध व्यवसाय व शेती संबंधी विषयीचे प्रशिक्षण देणार असून शेतकऱ्याची त्या संवाद साधणार आहेत .
विद्यार्थिनींचे स्वागत करताना सोनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल अनाप यांनी सांगितले की शेतकरी जिवापाड मेहनत करतो .आपल्या शेतातील पिकाचे प्रतवारी व गुणवत्ता याकडे तो जातीने लक्ष देतो परंतु विकलेल्या सोन्यासारख्या पिकाची मात्र आबाळ होते .त्याला हमीभाव भेटत नाही केव्हा तर झालेली गुंतवणूकही निघत नाही आणि तो निराशेच्या खाईत जाऊन पडतो . यासाठी तरुण शास्त्रज्ञांनी पिकावर होणारा खर्च कमी कसा करता येईल पिकाची गुणवत्ता वाढविण्याचे मार्ग , दुग्ध उत्पादनावरील खर्च कमी करणे दुधाची गुणप्रत वाढविणे आदी बाबत मार्गदर्शन करावे .
यावेळी उपसरपंच किराण अंत्रे ग्राम विकास अधिकारी पटेल, सदस्य एजाज तांबोळी सिताराम शिंदे राजेंद्र शिंदे प्रशांत अंत्रे भरत शिंदे विठ्ठल अंत्रे आदीजण उपस्थित होते .
कृषिकन्या शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पीक निरीक्षण माती परीक्षण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया बायोगॅस निर्मिती जलसंधारणाचे महत्त्व आदी विषयांवर शेतकर्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत .
सुमारे दहा आठवडे हा कार्यक्रम चालणार असून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दरंदले प्राध्यापक मनोज माने यांचे मार्गदर्शन त्यांना लागणार आहे पूजा चोरमले अनुजा काळे मोहिनी कर्डिले युनिका गावित या कृषिकन्या या प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत