राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये कार्यरत असलेल्या महिला क्लार्कच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण अज्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये कार्यरत असलेल्या महिला क्लार्कच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वीणा राजेश मंचरे (४३ वर्षे) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, श्री.स्वामी विवेकांनद नर्सिंग होम येथे क्लार्क म्हणून नोकरी करत असून दुपारी ३ वाजता राहूरी फॅक्टरी येथील अहमदनगर जिल्हा बँक शाखा रयेथे गेले होते. बँकेतील काम झाल्यावर नर्सिंग होमकडे पायी जात असताना नर्सिंग होमच्या गेट समोरून जात असताना दोन चोरटे मोटार सायकलवरून पाठीमागुन येवून पुढे जावुन पुन्हा थोड्या अंतरावरून परत येऊन गळ्यातील १ तोळ्याचे मिनी गंठण दीड तोळ्याचे गंठण असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून घेवून पोबारा केला. त्यानंतर चोरटे शिर्डीच्या दिशेने पळून गेले.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात विना राजेश मंचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत