सात्रळ/वेबटीम:- राज्यातील एस टी कर्मचाऱ्याचा संप मिटून बरेच दिवस उलटले असून ही अद्याप ग्रामीण भागातील बस फेऱ्या चालू न झाल्याने ग्राम...
सात्रळ/वेबटीम:-
राज्यातील एस टी कर्मचाऱ्याचा संप मिटून बरेच दिवस उलटले असून ही अद्याप ग्रामीण भागातील बस फेऱ्या चालू न झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत असून नाइलाजास्त्तव अवैध प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत असून ग्रामीण भागातील एस टी बस ची सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी भाजपा चे ओबीसी सेल चे जिल्हा चिटणीस बिपीन ताठे यांनी केली आहे. या मागणी संदर्भात लवकरच विभागीय नियंत्रकांना समक्ष भेटून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अवैध प्रवासी वाहनांत प्रमाणापेक्षा जास्त कोंबलेले प्रवाशी, मनाला येईल ते भाडे आकारणी,वाहनधारकांची अरेरावी, वाहने भरूस्तवर इतर प्रवाशांना सोसावा लागणारा त्रास, वाहनांची दुरावस्था इ. मुळे प्रवाश्याना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत असून एस टी बस सेवा तातडीने चालू करणे गरजेचे आहे अशी मागणी सामान्य प्रवाश्याकडूनमोठया प्रमाणात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत