करजगावच्या सरपंच पदी कोतकर तर उपसरपंच पदी देठे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

करजगावच्या सरपंच पदी कोतकर तर उपसरपंच पदी देठे

आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगाव ग्रामपंचायतीच्या नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्र...

आंबी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगाव ग्रामपंचायतीच्या नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे याच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदी युवा नेते गणेश दिगंबर कोतकर तर उपसरपंच पदी आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते अण्णासाहेब काशिनाथ देठे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री नवनाथ कोतकर, रतनबाई बाळासाहेब आरंगळे, भारती राधाकिसन कोतकर सुजाता सचिन लोंढे हे उपस्थित होते. सरपंच पदासाठी गणेश कोतकर यांच्या नावाची सूचना अण्णासाहेब देठे यांनी तर उपसरपंच पदासाठी अण्णासाहेब देठे यांच्या नावाची सूचना रतनबाई बाळासाहेब आरंगळे यांनी मांडली. याकामी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव यांनी काम पहिले. त्यांना ग्रामसेवक राक्षे भाऊसाहेब, कोतवाल राजेंद्र चक्रनारायण यांनी सहकार्य केले.


सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंत दादा लोंढे, सयराम कोतकर, राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती वेनुनाथ कोतकर, बाळासाहेब आरंगळे, माजी सरपंच नवनाथ कोतकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर नाना कोतकर, सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाबासाहेब हरीभाऊ कोतकर, सुरेश कोतकर, इस्माईल पठाण, राधाकिसन कोतकर, साहेबराव देठे, विलास देठे, बापू गायके, बाळासहेब कोतकर, पंढरीनाथ कोतकर, भागवत कोतकर, त्रिंबक कोतकर, चांगदेव कोतकर, सचिन लोंढे, संजय आरंगळे, कातोरे, कदम, विजय लोंढे, नवनाथ देठे, लक्ष्मण देठे, सुरेश देठे, चांगदेव आरंगळे, बापूसाहेब आरंगळे यांसह सर्व समर्थक, ग्रामस्थ आणि जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत