आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या करजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटी निवडणुकीमध्ये कुब...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या करजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटी निवडणुकीमध्ये कुबेरेश्वर तरुण मंडळाने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधी जनसेवा मंडळाचा 'व्हाईट वाश' दिला. निवडणुकीमध्ये ४७६ पैकी ४७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात १६ मते अवैध ठरली. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एस. वाय. आगळे यांनी निकाल घोषित केला. त्यांना सहायक निबंधक कार्यालयातील एन. डी. खंडेराय व संस्थेचे सचिव पोपटराव बोंबले यांनी सहकार्य केले.
सायंकाळी उशिरा मतमोजणी झाल्यानंतर कुबेरेश्वर तरुण मंडळाचे बाबासाहेब मोहनिराज कोतकर (२६०), सोपान कोतकर (२५६), शनिफ पठाण (२५६), भाऊसाहेब लोंढे (२५५), बापूसाहेब आरंगळे (२५०), आप्पासाहेब बेंद्रे (२४९), लवेंद्र कोतकर (२४८), राजेंद्र पवार (२४२), कैलास देठे (२६५), मनीषा लोंढे (२६५), लताबाई कोतकर (२५१), बाळासाहेब नाना साहेब कोतकर (२४२), जावेद पठाण (२६७) या तेरा उमेदवारांनी मोठया मताधिक्याने विजयश्री खेचून आणली.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा ग्रामदैवत हनुमान मंदिर प्रांगणात ग्रामस्थ व सभासदांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कुबेरेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब कोतकर, गोरक्षनाथ बेंद्रे, कोतकर, लोंढे, बेंद्रे, आरंगळे, देठे, पठाण, तुपे, खडके, गायके, पवार, कोबरणे, बडाख, कोल्हे, कोळसे, खरात, चौधरी, नलगे, मनाळ, झिने, लावरे, साबळे, माळवदे, बोठे, शिंदे, राजवळ, जाधव, निमसे, दुशिंग, अहिरे, कदम, दायमा, सय्यद, शेख, महाडिक, साठे, कातोरे, बोर्डे आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत