राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालक्यातील उंबरे गावाचे सुपुत्र व साई कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक डॉ.अशोक एकनाथ पागिरे यांना सन २०२२चा बेस्ट...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालक्यातील उंबरे गावाचे सुपुत्र व साई कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक डॉ.अशोक एकनाथ पागिरे यांना सन २०२२चा बेस्ट फायनान्सियल कन्सल्टंट या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
गोवा येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात संजय घोडावत ग्रुप चे चेअरमन संजय घोडावत, प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्रपाल सिंह आयोजक सौरव गौतम यांचे हस्ते पागीरे यांना सन्मानित करण्यात आले.
साई कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माध्यमातून गेले १२ वर्षापासून डॉ.पागिरे हे महाराष्ट्र राज्य सह इतर अनेक राज्यात सहकार व वित्त क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे कार्याची दखल घेत इंटरनॅशनल ब्रिलीयन्स अवॉर्ड संस्थेने या पुरस्करासाठी डॉ. पागीरे यांची निवड केली आहे.
डॉ.अशोक पागीरे यांचा वित्त व सहकार क्षेत्रातील उल्लखनीय कामाची दखल घेऊन दिल्ली येथील मानवी हक्क संरक्षण आयोगाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन काही दिवसापूर्वी सन्मानित केले आहे. या पुरस्कार सोहळ्या साठी विकास कुमार सर,सतीश ढोकणे,नवनाथ गवळी हे उपसथित होते.
डॉ.अशोक पागीरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
मला मिळालेला पुरस्कार हा वित्त व सहकार क्षेत्रातील प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा गौरव आहे.हा पुरस्कार मी माझ्या जन्मभूमी,आई वडील, कुटुंबीय व मित्र परिवाराला समर्पित करतो.मला मिळालेला पुरस्कार नविन पिढीच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल.
- डॉ.अशोक पागीरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत