देवळाली प्रवरा/वेबटीम:- रविवार १९ जून रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या तोफा उद्या शुक्रवार दिनांक 17 जू...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
रविवार १९ जून रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या तोफा उद्या शुक्रवार दिनांक 17 जून रोजी थंडवणार आहे. देवळाली प्रवरा विकास मंडळ व लोकसेवा मंडळ सांगता सभेद्वारे सभासदांशी संवाद साधणार आहे.
यंदाची देवळाली प्रवरा सोसायटीची निवडणूक देवळाली प्रवरा विकास मंडळासह लोकसेवा मंडळाने ही प्रतिष्ठेची केली असून काही केलं तरी सोसायटी ताब्यात घ्यायची असा चंग दोन्ही मंडळाने बांधला आहे. प्रचार नारळ शुभारंभलाच दोन्ही मंडळाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करून प्रचाराचा श्री गणेशा केला. गेल्या आठ दिवस दोन्ही मंडळाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सभासदांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांना साद घातली. वाड्या वस्त्यांवर बैठका, जेवणावळी यांनी चांगलाच जोर धरला होता.
रविवार १७ जुन रोजी सकाळी ८ ते ५ यावेळेत मतदान होणार असून त्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे.तत्पूर्वी उद्या देवळाली प्रवरा विकास मंडळ व लोकसेवा मंडळ सांगता सभा घेऊन प्रचाराची सांगता करणार आहे. कोण कोणावर काय टिका करणार? विकासाचे काय काय मुद्दे पुढे येणार हे उद्याच्या दोन्ही सांगता सभेतून पाहावयास मिळणार आहे.
एकंदरीत देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकी ही देवळाली प्रवरा विकास मंडळ व लोकसेवा मंडळाने प्रतिष्ठेची केली असून कोण बाजी मारणार, कोणाच्या किती जागा येणार याकडे सभासद व शहरवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत