संत ज्ञानेश्वर शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत ज्ञानेश्वर शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगाव(प्रतिनिधी) माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२२ चा निकाल जाहीर झाला असून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृ...

कोपरगाव(प्रतिनिधी)



माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२२ चा निकाल जाहीर झाला असून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी राखली असून शाळेतील कुमारी वेदश्री रुपेश जोशी हिने ९५% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला


.शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विशेष म्हणजे तब्बल ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अतुल बरदे याने ९३ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला प्रणित गंडे याने ९२.४० टक्के मिळवत तिसरा क्रमांक   पटकावला तसेच ऋतुजा गुजर ९२.२० टक्के, पल्लवी सिंग ९२ टक्के,श्रीगीता शिंदे ९२ टक्के,स्वर्ण दरांगे ९२ टक्के व राज जाधव ९१.६० टक्के या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे,सचिव किरण भोईर व कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचा एकुण निकाल गेल्या ५ वर्षांपासून १००% असून याही वर्षी तिच परंपरा कायम ठेवल्याने पालकांकडून शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक होत आहे. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी प्राचार्य सचिन मोरे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व शंभर टक्के निकालाची परंपरा व शाळेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी आवाहन केले. या वेळी दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले व पेढे वाटत आनंद साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत