'साई आदर्श' ची कृषी क्षेत्रात एन्ट्री - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'साई आदर्श' ची कृषी क्षेत्रात एन्ट्री

राहुरी(प्रतिनिधी) कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठी आव्हाने निर्माण झालेली आहे या आव्हानांना मात करत जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाने जगाच्या पा...

राहुरी(प्रतिनिधी)



कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठी आव्हाने निर्माण झालेली आहे या आव्हानांना मात करत जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाने जगाच्या पाठीवर आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे त्यास शिवाजीराव कपाळे यांच्या माध्यमातून आधार मिळत असल्याने बळीराजा नक्कीच हे आव्हाने येण्यासाठी समर्थ होईल कपाळे यांच्याबरोबर अनेकांनी आदर्श घेत कृषी संदर्भामध्ये प्रगती व्हावी म्हणून प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.

       याबाबत माहिती अशी कीतालुक्यातील मांजरी येथे साई आदर्श अँग्रो सव्हींसेस च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते त्याच बरोबर श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे विश्वस्त सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे राहुरी चे तहसीलदार एफ आर शेख कृषिभूषण सुरसिंग राव पवार विवेकानंद नर्सिंग होम चे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, कृषीभुषण माऊली पवार ,सरपंच विठ्ठलराव वीटनोर, आण्णासाहेब चोथे आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नुकतेच पार पडले.

        यावेळी बोलताना महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले की करोणा चा कालावधीमध्ये जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजा उभा राहिला मात्र शेतीमध्ये मोठी आव्हाने निर्माण झालेली आहे अन्नदाता असणाऱ्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत येतो या बळीराजाला नेहमी साथ देणे गरजेचे आहे. शिवाजीराव कपाळे यांनी शेतकऱ्यांसाठी ही संस्था उभी करून आपला आदर्श निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना आधार देण्याचे काम कपाळे कुटुंबांच्या वतीने केले जाणार आहे याचा आम्हाला अभिमान असून या कुटुंबाने नेहमीच सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात दिल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले की शिवाजीराव कपाळे हे जे काम हाती घेतात ते नक्कीच पूर्णत्वास लावतात मुळा माईच्या कडेला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून नक्कीच आधार मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.

    यावेळी बोलताना तहसीलदार एफ आर शेख यांनी सांगितले की तालुक्यामध्ये पतसंस्थेचे जाळे निर्माण करतानाच शिवाजीराव कपाळे यांनी सामाजिक भावना जपत सर्वांना आधार देण्याचे काम केलेले आहे ही संस्कृती चालू ठेवत असताना तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे नक्कीच ही संस्था शेतकऱ्यांच्या उपयोगी ठरून त्यांना आधार देण्याचे काम करेल असा आम्हाला विश्वास आहे.

  यावेळी वेदांत कपाळे यांनी प्रास्ताविक केले तर शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेचा उद्देश समोर ठेवला. यावेळी सरपंच अशोक टेमक, पानेगांवचे सरपंच संजय जंगले, सोसायटी चे चेअरमन आशीष बीडगर, रमेशराव पवार, कुशाराम जाधव, गणेश डोंगरे, राजेंद्र जगताप, तुषार वीटनोर, आण्णासाहेब वीटनोर, अशोक वीटनोर, सोपानराव बाचकर, लक्ष्मण चोपडे, वीष्णुपंत गीते, बाळासाहेब तांबे, कीशोर थोरात, अवीनाश साबरे, आबासाहेब वाळुंज, पारस नहार ,सुभाष वीटनोर, भीमराज वीटनोर, सचीन खडके साई आदर्श परीवार व शेतकरी बांधव ऊपस्थीत होते.आभार धीरज कपाळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत