राहुरी(प्रतिनिधी) रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या व सहकार क्षेत्रात नगर जिल्ह्यातील एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या राहुरी ...
राहुरी(प्रतिनिधी)
रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या व सहकार क्षेत्रात नगर जिल्ह्यातील एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गेल्या वीस वर्षापासून बिनविरोध निवडणुकीचा पायंडा यंदाही जपल्याने संस्थेचे आर्थिक हित यात साधण्यात आले आहे.
गुहा परिसरासारख्या ग्रामीण भागातील शेतकर्यांना अर्थसंजीवनी देऊन हरितक्रांतीला चालना देणार्या प्रेरणा सहकारी सोसायटी राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते स्व. डॉ.दादासाहेब तनपुरे यांच्या आशिर्वादाने व माजी खासदार प्रसादराव तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची सन 2002 साली स्थापना करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षापासून संस्था आणि शेतकर्यांचे आर्थिक हित बघताना संस्थेच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपण्यात आली आहे. यावर्षीही ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. संस्थेने सातत्याने सभासदांना लाभांशही दिल्याने त्यामुळे संस्थेने नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सहकारी संस्थेसमोर आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया सभासद शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
संस्थेची बँक व सभासद पातळीवर १०० टक्के वसुलीची परंपरा आहे. बिनविरोध आलेल्या संचालकांमध्ये सुरेशराव गोरक्षनाथ वाबळे, अशोक ज्ञानदेव उर्हे, गोरक्षनाथ मोहन चंद्रे, संजय सखाहरी लांबे, साईनाथ साहेबराव कोळसे, अशोक निवृत्ती सौदागर, आप्पासाहेब अशोक आंबेकर, जालिंदर ज्ञानदेव वर्पे,सौ .संगीता ज्ञानदेव कोळसे, श्रीमती पार्वती उत्तमराव कोळसे, श्रीमती अरुणाताई मुरलीधर ओहोळ , रवींद्र सोन्याबापू शिंदे, संदीप नानासाहेब गांडुळे आदींचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एम.ए.शेख यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत