देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय नाट्यमोडी घडून या निवडणुकित भाजपचे ज्येष्ठ नेते आसाराम ढुस व प्रहारचे आप्पासाहेब ढुस यांनी निवडणुकीतून युटर्न घेऊन दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले आहे.भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा विकास मंडळ १२ जागा लढवत असून भटक्या विमुक्त प्रभागातील एक जागा सुधीर टीक्कल यांच्या रूपाने बिनविरोध झाली आहे. माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रवादीचे अजित कदम, उद्योजक गणेश भांड, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, शिवसेनेचे  सुनील कराळे, काँग्रेसचे बाळासाहेब खांदे, अरुण ढुस  व इतर समाविचारी पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन लोकसेवा मंडळ १२ जागा लढवित आहे. सोसायटीची निवडणूक ही देवळाली प्रवरा नगरपालिकेची रंगीत तालिम असल्याचे बोलले जात आहे. आमने-सामने निवडणूक होत असल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल का अशी चर्चा सभासदांत सुरू आहे.


 देवळाली प्रवरा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९५ अर्ज वैध ठरले होते.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ७० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे.सर्वसाधारण गटातील ५४ अर्ज वैध होते. त्यापैकी ३८ उमेदवारांनी तर अनुसूचित जाती-जमातीमध्ये ७ अर्ज वैध होते त्यापैकी ५ उमेदवारांनी , महिला राखीव गटात १५ अर्ज वैध होते, त्यापैकी ११ महिला उमेदवारांनी , इतर मागास वर्ग गटातून ७ अर्ज वैध होते त्यापैकी ५ उमेदवारांनी, भटक्या विमुक्त गटातून १२ अर्ज वैध होते ११ उमेदवारांनी असे एकूण ७०उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. भटक्या विमुक्त गटातून एकमेव एकच अर्ज शिल्लक राहिला असून शेतकरी विकास मंडळाचे सुधीर विठ्ठल टिक्कल यांची बिनविरोधाची औपचारिकता बाकी राहिली आहे.


देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते माघारीच्या आदल्या दिवसापर्यंत चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती.परंतु अचानक राजकिय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आसाराम ढुस यांनी दाखल केलेले सर्वच उमेदवारी अर्ज मागे घेतले. 



तर प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व आप्पासाहेब ढुस  यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी व नंतर प्रहारला बरोबर घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पूर्ण होणार नाही. जर आम्हाला विचारात घेतले नाही तर आम्ही ताकदीनिशी स्वतंत्र निवडणूक लढवू अशी डरकाळी फोडली होती.परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राजकीय नाट्यमय घडामोडी काय घडल्या हे कोणाला समजले नाही. मात्र प्रहारच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आसाराम ढुस दोन दिवसानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. तर प्रहार कोणत्या भूमिकेत राहील? या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.


देवळाली प्रवरा सोसायटीच्या सर्वसाधारण कर्जदार गटात देवळाली प्रवरा विकास मंडळाचे शहाजी ठकाजी कदम, राजेंद्र विठ्ठल ढुस, सूर्यभान कृष्णाजी गडाख, बाबासाहेब जगन्नाथ शेटे, मंजाबापू सावित्रा वरखडे, संतोष जगन्नाथ चव्हाण, सुदाम जगन्नाथ भांड, उत्तम काशिनाथ मुसमाडे तर लोकसेवा मंडळाकडून बाळासाहेब जगन्नाथ भांड, शरद विश्वनाथ चव्हाण, नानासाहेब बाबुराव कदम, नानासाहेब सखाराम पठारे, बाळासाहेब जगन्नाथ खुरुद, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, अरुण कोंडीराम ढुस, हिराबाई भास्कर शेटे


अनुसूचित जाती-जमातीमध्ये देवळाली प्रवरा विकास मंडळाचे राजेंद्र पावलस पंडित तर लोकसेवा मंडळाचे बाबासाहेब संसारे यांच्यात तर इतर मागास वर्गीय गटात देवळाली प्रवरा विकास मंडळाचे दिलीप सोपान मुसमाडे तर लोकसेवा भागवत लक्ष्मण मुसमाडे यांच्यात सरळ लढत होणार आहे. महिला प्रतिनिधी गटातून देवळाली प्रवरा विकास मंडळाच्या संगीता भाऊसाहेब वाळुंज व स्वरूपा अभिजित कदम तर लोकसेवा मंडळाच्या निर्मला दत्तात्रय कराळे व सुमन सूर्यभान कदम निवडणूक रिंगणात उतरल्या आहे. भटक्या विमुक्त जाती-जमातीमध्ये देवळाली प्रवरा विकास मंडळाचे सुधीर विठ्ठल टीक्कल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने ही जागा बिनविरोध झाली. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध झाल्याचे अधिकृत जाहीर करणार आहे.


देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणूकीत २ हजार ४१० मतदार आहेत. १२ जागांसाठी २४ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहायक निबंधक कार्यालयातील किरण आव्हाड हे काम पाहत आहे. त्यांना देवळाली प्रवरा सोसायटीचे व्यवस्थापक सुभाष कदम, मधुकर मुसमाडे, राम गोंडे,चेतन कदम आदी मदत करीत आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत