राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात सातपिर बाबा दर्गानजीक आज शनिवार ४ जून रोजी पहाटे ३ वाजता दरोडा टाकण्याच्या तयारीत आल...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात सातपिर बाबा दर्गानजीक आज शनिवार ४ जून रोजी पहाटे ३ वाजता दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहेत. तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले असून यावेळी पोलीस व दरोडेखोर यांच्यात झलेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्यावर सतूरने हल्ला झाला असून ते जखमी झाले आहेत.
मयूर राजू ढगे, ईश्वर अशोक मोरे( दोन्ही रा.नाशिक) यांना पाठलाग करून पकडले पोलिसांनी पकडले असून इतर तीन आरोपी रणजीत केशव कांबळे, अजय पवार, राहुल मोरे( सर्व रा. निफाड, तालुका निफाड जिल्हा नाशिक) हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
आरोपी पकडताना पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्यावर आरोपी नाव मयूर ढगे याने त्याच्या जवळील सतूरने हल्ला करून बोकील यांना जखमी केले आहे .
.सदर आरोपी विरुद्ध नाशिक शहर येथे 10 गंभीर स्वरूपाचे शरीर आणि प्रॉपर्टी संबधी गुन्हे नोंद आहेत.इतर आरोपी यांचा शोध घेत असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा फझल करण्याची प्रकिया सुरू होती. पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान अवघ्या काही तासाने पळून जाण्यात यशस्वी झालेल्या रमेश वाकोडे (रा.अहिल्यादेवीनगर निफाड) व रणजीत केशव कांबळे(रा.कुंदे गल्ली, निफाड) या दोन आरोपींना शिर्डी येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत