राहुरी(प्रतिनिधी) पाथरे खुर्द येथे जनशिक्षण संस्था अहमदनगर व निर्भया बचत गट पाथरे यांच्या जॅम जेली प्रशिक्षण चे प्रमाण पत्र वितरणचा कार्यक...
राहुरी(प्रतिनिधी)
पाथरे खुर्द येथे जनशिक्षण संस्था अहमदनगर व निर्भया बचत गट पाथरे यांच्या जॅम जेली प्रशिक्षण चे प्रमाण पत्र वितरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी सभापती वंदना ताई मुरकुटे यांनी बचत गटाचे महत्व व लाभ व सरकारी विविध योजना ची माहिती उपस्थित सर्व महिलांना दिली.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक सौ. दिपाली पुराणिक यांनी केले.. स्वागत सौ. राधिका जाधव व उपसरपंच हिराबाई टेकाळे यांनी केले.
या वेळी जयश्री जाधव, ज्योती गावडे, राजश्री उंडे, मोहिनी पुराणिक, राजश्री पुराणिक, सगुणा पवार, रेणुका जाधव महिला उपस्थित होत्या. तसेच या वेळी अजित जाधव, कपिल जाधव, अच्युत जाधव, भिकचंद टेकाळे, दत्तात्रय उंडे, राजेंद्र पुराणिक, रमेश पुराणिक हे शेतकरी बांधव ही उपस्थित होते.
या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ. दिपाली पुराणिक व निर्मला जाधव यांनी केले.. तसेच आभार बचत गटाच्या अध्यक्षा सौ. निर्मला जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत