देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रविवार दि.२६ जून रोजी सकाळी सोसायटी डेपो परीसरात राजर्षी शाहू महाराजांची जयं...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रविवार दि.२६ जून रोजी सकाळी सोसायटी डेपो परीसरात राजर्षी शाहू महाराजांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने साजरी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, सोसायटीचे संचालक दिलीप मुसमाडे, सुदाम भांड तसेच सोमनाथ कोळसे, नानासाहेब पठारे, संदीप कदम, बाबाजी जगधने, सोमनाथ कीर्तने, संभाजी देशमुख, अनिल संसारे, सुरेश हारगावकर, विठ्ठल शिंदे, शिवाजी भोले, अनिकेत चव्हाण, अनिकेत माळवदे आदिंसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत