राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शवदाहिनीचे लोखंड चोरून घेऊन जात असताना रंगेहाथ पकलेल्या ४ ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शवदाहिनीचे लोखंड चोरून घेऊन जात असताना रंगेहाथ पकलेल्या ४ महिलांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाम ठिकाणावरून ४ महिला शवदाहिणीचे लोखंड गोळा करून गोण्यांमध्ये भरून घेऊन जात असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात सुनील कल्हापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा संतोष मंगलम, मीना शंकर जाधव, पूजा रवी गायकवाड, प्रिया काशिराम धोत्रे(सर्व. रा.कोल्हार,बेलापूर रोड, राहाता) यांच्याविरुद्ध भांदवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत