सात्रळ/वेबटीम:- भारत सरकार व ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर " ...
सात्रळ/वेबटीम:-
भारत सरकार व ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर " च्या अंतर्गत ब्रह्माकुमारीज् च्या सात्रळ-सोनगांव येथील 'तपोवन' मध्ये ब्रह्माकुमारीज् च्या प्रथम मुख्य प्रशासिका मातेश्वरी जगदम्बा सरस्वती यांचा 57वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. मातेश्वरी जगदम्बा सरस्वती यांचा महिमा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी जगदम्बा, सर्व जगाला ज्ञान धन देणारी माता सरस्वती, विषय विकारांवर विजय मिळवून देणारी, जीवनातील सर्व संकट हरणारी, आपल्या सर्वांची अलौकिक माता असे केले जाते. या प्रसंगी विद्यालयात मेडिटेशन, योग, तपस्या, प्रवचन व ब्रह्मा भोजनाचा कार्यक्रम झाला.ब्रह्म भोजनाचा प्रसाद म्हणून उपस्तिथ बंधू भगिनींनी तसेच इतरंही ग्रामस्थ यांनी लाभ घेतला. या प्रसंगी जागतिक योग दिवस निमित्त बी के स्वाती दीदींनी उपस्थितांकडून योग करवून घेतला. बी के पद्मावती दीदींनी मातेश्वरीजीं चे महावाक्य स्पष्ट करतांना नमूद केले की मनुष्याच्या सुख आणि दुःखाचे कारण त्याचे कर्म आहेत. सुखी जीवनाचा आधार श्रेष्ठ कर्म आहेत, व उपस्थित सर्वांनी श्रेष्ठ कर्म करण्याचा संकल्प आजच्या दिवशीकरण्याचे आवाहन केले. आदरणीय बी के शिवाजी भाईजी यांनी मातेश्वरीजीं च्या जीवन कार्या विषयी अनुभव सांगत मातेश्वरीजीं चा श्रेष्ठ जीवनपटच जणू सर्वांच्या समोर उभा केला.
सदर प्रसंगी सात्रळ सोनगांवपंचक्रोशी तील विजयभाऊ कडू, उषाताई वि.कडू, प्रकाश वालझाडे, अनिता वालझाडे, वैशाली वालझाडे, भाऊसाहेब सजन, निर्मला सजन, अर्चना प्रधान, सुभाष शेजवळ, कोल्हार चे संपतराव खर्डे, दत्तात्रय कसबे तसेच आश्वी येथून रामदास गीते,विष्णूभाई उंबरकर, उक्कलगाव चे शरद थोरात तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ईश्वरीय प्रसाद ब्रह्माभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत