राहुरी तालुका मनसेच्यावतीने ' या' पत्राचे नागरिकांना वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुका मनसेच्यावतीने ' या' पत्राचे नागरिकांना वाटप

राहुरी(प्रतिनिधी) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनाधिकृत  मशिदिंवरील भोंगे काढण्याबाबत जनतेला पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रती मनसे तालुकाध्...

राहुरी(प्रतिनिधी)


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनाधिकृत  मशिदिंवरील भोंगे काढण्याबाबत जनतेला पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रती मनसे तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा,चिंचविहिरे, कनगर, गुहा,शहरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांच्या घरोघरी पोहोचून हे पत्र वाटप करण्यात आले



यावेळेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भोंग्याचा होत असलेला त्रास बंद झाला म्हणून अनेक नागरिकांनी राजसाहेबांचे आभार मानले.



याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, राहुरी तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस,मनविसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे,तालुका सचिव अनिल गीते , तात्याराम गीते,प्रमोद विधाटे,अमोल पाटोळे,नरेश गोरे,स्वप्नील आहेर,सनी सोनवणे, ओम तारडे शुभम जाधव व प्रत्येक गावातले स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत