गणेगाव येथे पोलीस मित्र संघटनेची स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव येथे पोलीस मित्र संघटनेची स्थापना

  गणेगाव(प्रवीण कोबरणे) राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षक आणि माहिती संघटना अहमदनगर अंतर्गत पोल...

 गणेगाव(प्रवीण कोबरणे)


राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षक आणि माहिती संघटना अहमदनगर अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण संपन्न झाले.



  यावेळी मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या हस्ते फित कापून पोलीस मित्र संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रदेश संपर्कप्रमुख भरत नजन, प्रदेश संघटक संतोष जावळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे, खानदेश विभाग प्रमुख योगेश पाटील, सरपंच अमोल भनगडे, उपसरपंच विकास कोबरणे, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे, साहेबराव कोबरणे, अशोक खरमाळे, राजेंद्र वानखेडे, सचिन चांदघोडे, सोनाली कुसळकर, संतोष आहेर, योगेश सुराणा,  गणेश हिंगे, शँकर कवाणे आदी उपस्थित होते.


 पोलीस मित्र संघटना गणेगावच्या अध्यक्षपदी निलेश पेरणे, उपाध्यक्षपदी विजय कोबरणे, सचिव म्हणून संतोष खाडे, संघटकपदी विकास कोबरणे, संपर्कप्रमुख म्हणून ज्ञानेश्वर कोबरणे यांची निवड करण्यात आली. तर प्रकाश कोबरणे, योगेश कोबरणे, सोन्याबापु कडू, योगेश पेरणे, तेजस  आरंगळे, राहुल कोबरणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत