कोपरगाव / प्रतिनिधी कोपरगाव शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा नुकताच जिल्हा ...
कोपरगाव / प्रतिनिधी
कोपरगाव शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडून पोलीस निरीक्षक वासुदेव देसलेंचा सन्मान देऊन सन्मान केला आहे.
शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोरीच्या २१ मोटरसायकली जप्त करून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक देसले यांचा गुन्हे परिषदेत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, सर्व पोलीस उपअधीक्षक, सर्व जिल्हा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आदी उपस्थित होते. याबद्दल पोलीस निरीक्षक देसले यांच्यावर नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत