💫 एकांत 💫 कधी कधी नकोस वाटत सगळं काही तेव्हा मात्र एकांत हवा असतो अलगद भूतकाळाच्या पानावर जावून मन हे रेंगाळत असते... कधी कधी मन भूतक...
💫एकांत💫
कधी कधी नकोस वाटत सगळं काही
तेव्हा मात्र एकांत हवा असतो अलगद
भूतकाळाच्या पानावर जावून मन हे रेंगाळत असते...
कधी कधी मन भूतकाळात झालेल्या वेदनांचा
हिशोब लावत असते तर कधी येणाऱ्या भविष्यात रमत असते...
कधी कधी आपल्या जवळच्या माणसाच्या आठवणीत
रडते तर त्याच आठवणी आठवून मन सुखावत असते...
कधी कधी एकांतामध्ये अनेक प्रश्न येतात
त्याच प्रश्नाचं उत्तर हे मन सापडत असते...
कधी कधी एकांतामध्ये रडून रडून कोरडे झालेले
डोळे परत एका नवी उम्मीदीने जगाकडे बघत असते...
कधी कधी मनाला एकटेपणा हवा असतो स्वतःसाठी, आपलाच आपल्याशी संवाद घडवून आणण्यासाठी!!!!
#मनिषा_रंजना_बाळासाहेब_लांबे ✍🏻
खुप छान.. कधी कधी खरच एकांत हवा असतो फक्त... स्वतः साठी...
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूपचं छान...
उत्तर द्याहटवा