सात्रळ/वेबटीम:- औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी आणि आदिवासी बांधवांसाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्र...
सात्रळ/वेबटीम:-
औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी आणि आदिवासी बांधवांसाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सात्रळ (ता. राहुरी) तसेच पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालय, प्रवरानगर, राहाता महाविद्यालय तसेच चिचोंडी महाविद्यालय (शेंडी) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय औषधी वनस्पती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा फाउंडेशन महाविद्यालय, चिचोंडी (भंडारदरा) येथे दि. 30 जून रोजी करण्यात आल्याची माहिती सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एम. डोंगरे यांनी दिली.
सदर कार्यशाळेसाठी सन्माननीय आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील व सौ. शालिनीताई विखे पाटील (मा. अध्यक्षा, अहमदनगर जिल्हा परिषद, अहमदनगर) उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळा राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती क्षेत्रीय सह सुविधा केंद्र वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यरत आहे. या केंद्राच्या अंतर्गत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान हे राज्य तसेच दीव दमण आणि दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. ह्या केंद्राच्या माध्यमातून औषधी वनस्पतीं बद्दल जनजागृती, औषधी वनस्पती संवर्धन, लागवड व मूल्यवर्धन होणाऱ्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण, कार्यशाळा, खरेदीदार विक्रेता संमेलन तसेच चर्चासत्रे, वेबिनार, परिसंवाद आदिंचे आयोजन करण्यात येते अशी माहिती प्रा. डॉ. डी. एन. मोकाट (पी.आय व विभागीय संचालक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, पुणे) यांनी दिली.
औषधी वनस्पतींचा वापर करुन रुग्ण सेवा करणारे शेतकरी तसेच वनस्पतींचे औषधी ज्ञान असणारे आदिवासी बांधव या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वनस्पती ओळख, संवर्धन, लागवड, प्रक्रिया, विपणन इ.विषयी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रा. डॉ. डी. एन. मोकाट (पी.आय व विभागीय संचालक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, पुणे), प्रा. डॉ. अविनाश आडे (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), श्री. एस. एच.पाटील (अध्यक्ष, जैवविविधता मंडळ, पुणे), श्री. कैलास मोटे (संचालक, एम.एस.एच.एम.पी.बी.,पुणे), मा. जगताप साहेब ( एस.ए.ओ. अहमदनगर), डॉ. स्वप्नील शिंदे (संचालक, आयुष आयुर्वेद लि., पुणे) डॉ.अक्षय देशमुख (संचालक, कल्पतरु हर्ब) श्री. किरण अभ्यंकर (संचालक, वेल केअर नॅचरल, पुणे), श्री. जेतिन साठे (विभागीय प्रमुख, बायोफ नाशिक), श्री. अमोल आडे (वनक्षेत्रपाल,कळसूबाई-हरिश्चंद्रड अभयारण्य) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
कार्यशाळेसाठी जनसेवा फौंडेशनचे सेक्रेटरी व कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर, प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमुख, प्र. प्राचार्य संजय लहारे, डॉ. महेश खर्डे, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एम. डोंगरे, प्रा. डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल वाबळे, कार्यशाळेचे समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. रामदास बोरसे इत्यादी संयोजन समिती सदस्यांच्या नियोजनाखाली कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत