राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सध्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीचे वारे वाहू लागले असताना इच्छुकांनी मतदारांशी संपर्क करून व...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
सध्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीचे वारे वाहू लागले असताना इच्छुकांनी मतदारांशी संपर्क करून वाढविला आहे.राहुरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते ऋषभ लोढा यांनी आदिनाथ वसाहत भागातील अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचा प्रश्न स्वखर्चातुन मुरूम टाकून मार्गी लावला आहे.लोढा यांनी आगामी पालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणुक लढवण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना व प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे.राहुरी फॅक्टरी परीसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक ऋषभ लोढा हे ही प्रभाग क्रमांक ८ मधून इच्छुक झाले असून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.त्यांच्या या निर्णयाला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.
लोढा वास्तव्यास असलेल्या आदिनाथ वसाहत भागात भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे व सततच्या संततधार पावसामुळे रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने लोढा यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून मुरूम टाकून रोजच्या त्रासातून नागरिकांना मुक्त केले आहे.या भागातील नागरिकांना चिखलातून वाट काढावी कशी असा दररोज प्रश्न पडत होता. परंतु तात्काळ लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून ऋषभ लोढा यांचे आभार मानले आहे.काही नागरिकांनी तर जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ऋषभ लोढा यांच्या सारखा तरुण व तत्पर नगरसेवकच पाहिजे...असे बोलून दाखविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत