सात्रळ/वेबटीम:- सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, बापूजी सहादूकडू पाटील कनिष्ठ(कला व विज्ञान) महाविद्यालयाचा एच.एस.सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, बापूजी सहादूकडू पाटील कनिष्ठ(कला व विज्ञान) महाविद्यालयाचा एच.एस.सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला.यात कनिष्ठ महाविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली असून कला विभागाचा १००% व विज्ञान शाखेचा निकाल ९९.०९ % लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे २२१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.यामध्ये ५४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य व १४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक-१.कु.पलघडमल भक्ती प्रसाद-८८.५०% २.दिघे भूषण सुभाष- ८६.०%, ३.कु.कडू अक्षता संपत-८५.८३% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
त्याचप्रमाणे कला शाखेतून ७३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते.त्यामध्ये ०२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य व १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कलाविभागातील अनुक्रमे विद्यार्थी-१.कु.सय्यद आस्मा अन्सार ७५.१७% व कु.तांबोळी मुज्जकीरा कय्युम-७५.१७-२. कु.प्रधान गायत्री आप्पासाहेब-७४.१७-३.अनाप राहुल संतोष -७१.६७% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणा-या प्राध्यापकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष,मा.अरुण कडू पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष मा.आमदार आशुतोषजी काळेसाहेब,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अॅड विजयराव कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे पाटील, बबनराव कडू,भास्करराव फणसे, किशोर भांड, डॉ.बोरा, युवा नेते किरण कडू , पंकज कडू, विक्रांत कडू, गणेश कडू, प्रभारी प्राचार्य सिताराम बिडगर, माजी प्राचार्य अशोकराव वानखेडे,भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक, शिक्षणप्रेमी आदि मान्यवर अभिनंदन केले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत