देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कर्त्याव्यदक्ष कर्मचारी मुकुंद रामराव मुसमाडे यांचे आज गुरुव...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कर्त्याव्यदक्ष कर्मचारी मुकुंद रामराव मुसमाडे यांचे आज गुरुवार दि.९ जून रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुकुंद मुसमाडे हे देवळाली प्रवरा नगरपरिषदेत फायरमन खात्यात ते अनेक वर्षांपासून कार्यरत होते.तसेच नगरपरिषदेतील विद्युत विभाग,वृक्षारोपण विभाग व वाहन विभागाची जबाबदारीही त्यांच्यावर होती.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालविली असून सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,दोन मुली,जावई,भाऊ,भावजय,असा मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत