राहुरी(वेबटीम) बऱ्याच वेळेला शेतकरी पेरणीसाठी घाई करतात. पण पेरणी करण्यासाठी जमिनीमध्ये किती ओलावा असल्यानंतर पेरणी करावी हे माहित असणे गर...
राहुरी(वेबटीम)
बऱ्याच वेळेला शेतकरी पेरणीसाठी घाई करतात. पण पेरणी करण्यासाठी जमिनीमध्ये किती ओलावा असल्यानंतर पेरणी करावी हे माहित असणे गरजेचे आहे.
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी. 26 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करणे महत्वाचे आहे.शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर भुसभुशीत होते. अशा जमिनीत पेरणी जर ट्रॅक्टरने केली तर बियाणे अधिक खोलीवर पडते. अशा वेळी सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ व बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरणालगत असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, म्हणून खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते. त्यामुळे पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सें.मी.पेक्षा अधिक खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पेरणी 74 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी.
सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. व नंतर त्यांची पेरणी करावी.
*मुसमाडे प्रमोद गोवर्धन*
Bsc.Agri , ACABC
Registered Agriculture Entrepreneur MS -22574
कोणत्याही टिप्पण्या नाहीत