आंबी राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील योगिता सुभाष मोरे-ताजने यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पीएचडी पदवी प्रा...
आंबी
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील योगिता सुभाष मोरे-ताजने यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. सौ. मोरे-ताजने यांनी पीएच. डी. संशोधनासाठी ‘शेतमालाच्या आधारभूत किंमती व महागाई निर्देशांकाच्या संबंधाचा चिकित्सक अभ्यास : विशेष संबंध पश्चिम महाराष्ट्र’ हा विषय निवडला होता. योगिता मोरे-ताजने या सध्या राहुरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागात सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉ. व्ही. बी. बैरागी व पती डॉ. उमेश ताजने यांचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबाची जबाबदारी पेलून त्यांनी हे यश मिळवले आहे.
या कामी त्यांना सह मार्गदर्शक म्हणून प्रा. जे. आर.भोर, राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, उपप्राचार्य प्रो. बी. डी. रणपिसे, डॉ. बारहाते, प्रा. विजय पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व खासदार डॉ. सुजयदादा विखे,अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृषिभूषण सुरसिंगराव पवार, जनरल सेक्रेटरी महेश पाटील, जॉईंट सेक्रेटरी विजयराव डौले, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, कार्यालयीन अधीक्षक ए. बी. पारखे, राहुरी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांचे राहुरी तालुक्यातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत