राहुरी(वेबटीम) डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED यांच्या संयुक्त विद्य...
राहुरी(वेबटीम)
डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED यांच्या संयुक्त विद्यमानाने राहुरी पंचायत समिती येथे काॅम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग प्रशिक्षण पूर्ण झालेल्या स्वयं सहायता युवा गटातील प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी तालुका पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रतापराव दराडे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.सुरेंद्रभाऊ थोरात हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे श्री तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्री दिलावर सय्यद , वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा युवा महासचिव आप्पासाहेब मकासरे, संकेत तनपुरे, महेश साळवे, हर्षल साळवे, पंचायत समिती चे विस्तार अधिकारी श्री.दळे साहेब, कोकाटे साहेब, विधाते साहेब उमेद प्रकल्प चे श्री अशोक खोमणे, समतादूत पिरजादे एजाज आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम ची सुरूवात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व संविधान उद्देशिका चे वाचन करून करण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक मा. श्री प्रताप दराडे साहेब यांनी उपस्थित परीक्षार्थिंना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी बार्टी व जिल्हा उद्योजकता विकास केंद्र अनुसूचित जाती च्या युवक युवती साठी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात काम करत असून युवक युवती नी अशा प्रशिक्षणाची सध्या च्या काळात खुप आवश्यकता आहे असे मत मांडले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुरेंद्रभाऊ थोरात यांनी सर्व जाती धर्मातील युवक युवती ना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व सध्या च्या काळातील बेरोजगारीला रोजगार मिळविण्यासाठी, तसेच यातुन समता प्रस्थापित करण्यासाठी बार्टी चे विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वोपतरी मदत करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे श्री तात्यासाहेब जिवडे यांनी CMEGP व PMEGP योजना विषयी सविस्तर माहिती देऊन या योजनेसाठी जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी नी आपले ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी आव्हान केले. श्री.दिलावर सय्यद यांनी बार्टी च्या विविध प्रकल्पाविषयी माहिती देऊन अनुसूचित जाती च्या योजना विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षण पुर्ण झालेल्या सर्व युवा गटातील सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. तसेच तालुक्यातील 12 वी व क्रिडा स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थी चा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बार्टीचे राहुरी तालुका समतादूत पिरजादे एजाज यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा युवा महासचिव चे आप्पासाहेब मकासरे व महेश साळवे यांनी विशेष प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत