सात्रळ/वेबटीम:- सात्रळ गावाच्या स्मशान भूमी नूतनीकरण कामाचा शुभारंभ जनसेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रतापराव कडू तसेच स्थानिक भाजप ...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ गावाच्या स्मशान भूमी नूतनीकरण कामाचा शुभारंभ जनसेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रतापराव कडू तसेच स्थानिक भाजप चे जेष्ठ नेते सुखदेवराव ताठे यांच्या हस्ते पार पडला. 15 व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत स्मशान भूमी नूतनीकरनाचे काम होणार असून या मध्ये अंत्यविधी जागेचे आर. सी. सी. शेड, विसावा ओट्टा , स्मशानात येणारा रस्ता कॉंक्रेटीकरण, दशक्रिया विधी जागेची सुधारणा तसेच स्मशानातील बैठक जागेची सुधारणा इ. कामे होणार आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत चे जेष्ठ सदस्य रमेश पन्हाळे, सात्रळ चे सरपंच सतीश ताठे, विखे कारखान्याचे संचालक बाबुराव पडघलमल, जे. पी. जोर्वेकर, साहेबराव नालकर, कारभारी मारुती डुक्रे,मुश्ताकभाई तांबोळी, सि. के. कडू, सीताराम शिंदे,अनिकेत शिंदे, ग्रामस्थ, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शेजवळ, डुक्रे, संजय पडघलमल, अनिल भगत उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत