देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यात राजकिय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदान...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यात राजकिय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदानास अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजप तथा देवळाली प्रवरा शहर विकास आघाडी आणि महाविकास आघाडी तथा लोकसेवा मंडळाच्या उमेदवारांनी सभासदांच्या वयक्तिक भेटीवर जोर दिला असून दोन्ही गटाचे प्रमुख घोंगडी बैठका घेऊन सभासदांशी संवाद आहे.
देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक ही सत्ताधारी भाजप अर्थात देवळाली विकास मंडळाने प्रतिष्ठीत केली आहे. कुठल्याही परिस्थितीत सत्ता हातातून जाऊ नये म्हणून कदम पिता-पुत्र त्यादृष्टीने नियोजन करत आहे.
तर दुसरीकडे काही झालं तरी यंदा सोसायटीवर झेंडा फडकावयाचा हा चंग करून निवडणुकीत उतरलेले महाविकास आघाडी तथा लोकसेवा मंडळाचे अजित कदम, बाळासाहेब चव्हाण, गणेश भांड, सुनील कराळे,सुरेंद्र थोरात फिल्डींग लावत आहे.
सभासदांना आपलेसे करुन आपल्या सोसायटीच्या माध्यमातून पुढील काळात कसा विकास करणार हीच बाब दोन्ही गटांचे नेते मंडळी सभासदांना देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
प्रचार नारळाच्या पहिल्यास दिवशी दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. यंदाच्या निवडणुकीत व्यक्तीक टीका-टिपण्णी होत असताना आणखी ८ दिवस प्रचारास शिल्लक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम होण्याची शक्यता आहे.
सध्या दोन्ही मंडळाचे नेते व उमेदवारांच्या घरोघर मतदारांन साद घालत आहे. वाड्या वस्त्यांवर बैठकांनी ही जोर धरला आहे. १९ जून रोजी १२ जागांसाठी २४१० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
देवळाली प्रवरा विकास मंडळ व लोकसेवा मंडळ १७ जून रोजी बाजार तळावर सांगता सभा घेऊन एकमेकांवर तोफ डागणार आहेत. मात्र सभासदांचा कौल यंदा कोणाला मिळणार हे मात्र १९ जूनच्या रात्री समजणार आहे.
*सभासदांना लक्ष्मी दर्शनची अपेक्षा*
गेल्या अनेक दिवसांपासून सोसायटी निवडणूकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. राहुरी तालुक्यात अनेक बड्या सोसायटीच्या निवडणूक झाल्या तर काही होणे बाकी आहे. या निवडणुका राजकिय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा, चेडगावसह अनेक सोसायटी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'लक्ष्मी दर्शन' झाले. त्यामुळे अन्य सर्व सोसायटी निवडणुकीत सभासदांना ' लक्ष्मी दर्शनाची' अपेक्षा लागली आहे देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीतही सभासदांना लक्ष्मी दर्शनाची आस लागली आहे. निवडणुकीला सामोरे जाणारे दोन्ही मंडळ सभासदांना खुश करतील आणि लक्ष्मी दर्शन झाल्यावरच सभासद मतदानाला बाहेर पडतील अशी शक्यता आहे.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत