उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा शेतात कष्ट करुनी झिजूनिया गेला शेतात पिकवतो सोनं मातीला मानुनीया माय घर गळक असूनही त्याला लागती...
उभ्या जगाचा पोशिंदा
माझा शेतकरी राजा
शेतात कष्ट करुनी
झिजूनिया गेला
शेतात पिकवतो सोनं
मातीला मानुनीया माय
घर गळक असूनही त्याला
लागती पावसाची आस
त्याला नसते काळ्या रातीची भीती
कारण त्याला जगवायचे असते पीक
केले जाते त्याच्यावरती राजकारण
तरी तो उभा राहतो खंबीर
त्याला बाजारात मिळतो कवडीमोल भाव
कष्टाचे नाही होत चीज म्हणून परत जातो खचून
कर्जाच्या ओझ्याखाली जातो दबून
वाटते त्याला जावा आता काळ्या आईत समावून
डोळयात अश्रू घेऊन परत लढण्यास
तयार होतो माझा शेतकरी राजा
काळी आई परत माझ्या कष्टाना साथ दे अस म्हणून करतो सुरवात.....
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत