श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूलचे उपशिक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १३१ चे मतदा...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूलचे उपशिक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १३१ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सागर दत्तू माळी यांना अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पुरस्कार १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोषित केला होता. त्याचे वितरण शुक्रवारी (दि. ०१) श्रीरामपूरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कृत झालेले उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याबरोबर सागर माळी यांनाही उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्याच्या शिरपेचात दुहेरी तुरा रोवला गेला आहे. मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओ, याकामी सहकार्य करणारे पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांचा आहे अशी भावना माळी यांनी व्यक्त केली. माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, संगायो नायब तहसीलदार श्रीमती मगरे, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, अव्वल कारकून अर्जुन सानप, महसूल सहायक संदिप खाडे, शिवाजी गायकवाड, संदिप पाळंदे, राजेश कवाने, प्रितेश तांदळे यांचेसह मतदारसंघातील सर्व बीएलओ व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत