झेडपीची प्रारुप मतदार यादी आज होणार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

झेडपीची प्रारुप मतदार यादी आज होणार जाहीर

  नगर : वेबन्युज।     राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण कार्यक्रमाला स्थगित...

 

नगर : वेबन्युज।


    राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र, मतदारयादीचा कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्यानुसार आज सोमवार दि 18 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्या पूर्वतयारी आयोगाने सुरु केली होती. त्यानुसार गट व गणांची अंतिम रचना २७ जून रोजी झली. यानंतर आयोगाने ५ जुलै रोजी गट व गणनिहाय आरक्षण कार्यक्रम जाहीर केला, त्यांच्या दुसऱ्या दिवशीच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र,  १२ जुलै रोजी निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाला  स्थगिती दिली. निवडणुकीसाठी मतदारयादी  कार्यक्रम सुरुच ठेवला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली  विधानसभेची मतदार यादी वापरण्यास आयोगाने मुभा दिली.

जिल्हा प्रशासनाने या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद गट व गणांची प्रारुप मतदार यादी तयार केली असून, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच पंचायत समित्यांच्या कार्यालयांत पाहणीसाठी निरीक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. मतदार यादीवर काही आक्षेप असल्यास २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती तहसील कार्यालयात देता येतील . २९ जुलै रोजी गट व गणनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर ही मतदार यादी ८ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान केंद्रनिहाय प्रसिध्द होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत