राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या सेवेतून प्रयत्न केले व गावातील समाज बांधवांचे हित ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या सेवेतून प्रयत्न केले व गावातील समाज बांधवांचे हित जोपासले असे व्यक्तिमत्व श्री ज्ञानदेव मुरलीधर सिनारे यांनी राहुरी तालुका कामगार पोलीस पाटील या पदावर कार्यरत राहून आजपर्यंत एकोणतीस वर्षे सात महिने कार्यरत राहून गावातील सर्वच घटकातील समाज घटकांना आपल्या पदामार्फत न्याय देण्याची काम केले. गावातील कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाच्या मार्फत जपून गावाची लौकिककता, प्रेमभाव, आपुलकी बांधून ठेवली.त्यामुळेच गावाला तंटामुक्तीचे पुरस्कार देखील यापूर्वी प्राप्त झाले आहे.कोरोना महामारीच्या काळामध्ये एक उत्कृष्ट कामगार पोलीस पाटील म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरविण्यात आले. या सर्व गोष्टीला अनुसरून गावासाठी असलेली त्यांची आत्मीयता पाहून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ करण्यात आला.
कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र बुवाजी हारदे होते,भाजपा युवा मोर्चा राहुरी तालुका उपाध्यक्ष नामदेव कांबळे,सप्तशृंगी दूध संस्थांचे चेअरमन शांताराम(आबा) सिनारे,माजी सभापती भिमराज हरदे,राजेंद्र सिनारे मंजाबापू चोपडे,विजय सिनारे,आदिक सोनवणे सर, बबनराव सिनारे अन्सार पठाण या मान्यवरांची भाषणे झाली.
व्यासपीठावरून बोलताना नामदेव कांबळे म्हणाले कि, माणूस हा नावाने नसून स्वतःच्या कर्तुत्वाने मोठा असतो हे आपल्या गावच्या पोलीस पाटलांनी त्यांच्या आजवरच्या सेवेतून हे सर्वांना दाखवून दिले. गावातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत गावाची पवित्रता सदैव जपण्याचे काम केले.कोरोना काळामध्ये अगदी कठीण प्रसंगात त्यांनी प्रत्येक नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले म्हणून अशा नेतृत्वाचा आज सन्मान होत आहे.
भिमराज हारदे म्हणाले की, निंभेरे तुळापूर आपल्या या गावांमध्ये त्यांनी पोलीस पाटील म्हणून सेवेत असताना सामाजिक बांधिलकी सोबत नागरिकांनी आपापसातील मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावं आपल्या गावचा विकास व्हावा याच हेतुने आजवरती समाजिक कार्य करून आपल्या पदाला सदैव न्याय दिला म्हणून अशा व्यक्तीचा आम्हाला सदैव अभिमान वाटतो.
यावेळी सर्जेराव सिनारे यांचा देखील प्रवरा हॉस्पिटलमधून सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास ज्ञानदेव साबळे,वेणुनाथ सिनारे, संदेश सिनारे, भाऊसाहेब सांगळे, प्रकाश सिनारे, दत्तात्रय गिरी, कैलास नागरे. रहेमान पठाण, सतीश नाकाडे,प्रकाश कांबळे,गोरक सांगळे,किशोर सिनारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य विजय सिनारे यांनी केले तर आभार सुभाष सिनारे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत