करजगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी कोतकर तर उपाध्यक्षपदी देठे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

करजगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी कोतकर तर उपाध्यक्षपदी देठे

आंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगाव विविध सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. नुक...

आंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगाव विविध सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मोहनीराज कोतकर तर उपाध्यक्षपदी कैलास रघुनाथ देठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


      बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी संजय आगळे हे होते. निवडणूक प्रक्रियेत त्यांना सचिव पोपटराव बोंबले यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्षपदाची सूचना नूतन संचालक आप्पासाहेब बेंद्रे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब नानासाहेब कोतकर यांनी अनुमोदनदिले. तर उपाध्यक्ष पदाची सूचना संचालक जावेद पठाण यांनी मांडली. त्यास अनुमोदन सोपान कोतकर यांनी दिले. यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मोहनिराज कोतकर व उपाध्यक्ष कैलास देठे यांचा सोसायटीच्या प्रांगणात भव्य सत्कार करण्यात आला. निवडी नंतर कोतकर व देठे म्हणाले की मिळालेल्या पदातून संस्थेचे हित जोपासले जाईल. गट-तट न बघता सर्व सभासदांचे कामे केली जातील. यावेळी संस्थेचे संचालक आप्पासाहेब बेंद्रे, सोपान कोतकर, लवेंद्र कोतकर, शनिफ पठाण, राजेंद्र पवार, भाऊसाहेब लोंढे, बापूसाहेब आरंगळे, लताबाई पोपट कोतकर, मनीषा सुनील लोंढे, बाळासाहेब नानासाहेब कोतकर, जावेद पठाण हे संचालक उपस्थित होते.


      यावेळी कुबेरेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब कोतकर, गोरक्षनाथ बेंद्रे, तसेच कोतकर, लोंढे, बेंद्रे, आरंगळे, पठाण, तुपे, खडके, गायके, पवार, कोबरणे, बडाख, कोल्हे, कोळसे, खरात, चौधरी, नलगे, मताळ, झिने, लावरे, साबळे माळवदे, देठे, शिंदे, राजवळ, जाधव, निमसे, अहिरे, कदम, दायमा, सय्यद, शेख, महाडिक, साठे, कातोरे, बोर्डे, गांगुर्डे यांसह कुबेरेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाभळेश्वर दूध संघाचे संचालक बाळासाहेब नानासाहेब कोतकर यांनी केले तर जावेद पठाण यांनी आभार मानले.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत