राहुरी(वेबटीम) आदिवासी विकास विभागाकडुन राहुरी तालुक्यातील कोळेवाडी व चिखलठाण येथे आज शनिवारी खावटी योजने अंतर्गत किराणा किटचे व शिधा पत...
राहुरी(वेबटीम)
आदिवासी विकास विभागाकडुन राहुरी तालुक्यातील कोळेवाडी व चिखलठाण येथे आज शनिवारी खावटी योजने अंतर्गत किराणा किटचे व शिधा पत्रिकेचे वाटप युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले
आदिवासी विकास योजने मार्फत सध्या खावटी किट वाटप दुसरा टप्पा सुरु झाला असुन वंचितआदिवासींना अत्यावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तनपुरे म्हणाले की, आदिवासी विकास खात्यामार्फत महाविकास आघाडी सरकार विविध योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये करोना काळात आदिवासी कुटुंबाना रोख रक्कम व किराणा किट वाटण्यात आल्या तसेच पन्हाळी पत्र्याचे वाटपही या विभागाकडुन करण्यात आले होते. ज्या ज्या योजना राबविता येईल त्या त्या योजना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. यावेळी आदिवासी कुटुंबाना शिधापत्रिकेचे वाटप
करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती विजय आंबेकर विलास गागरे काशिनाथ गवारी सुभाष काकडे इसाक सय्यद बापूसाहेब काकडे विनोद काळनर विजय बाचकर आबासाहेब काळनर सुभाष बाचकर तालुका समन्वयक श्री भिंगारदिवे व आदिवासी विभागातील कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत