देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची रविवार सकाळी ११ वाजता निवड होणार असून कदम पिता-पुत्र यांनी...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची रविवार सकाळी ११ वाजता निवड होणार असून कदम पिता-पुत्र यांनी ठरविलेल्या संचालकांना या दोन्ही पदावर बसण्याचा बहुमान मिळणार आहे हे मात्र तितकेच खरे. चेअरमन पदासाठी संतोष चव्हाण, उत्तम मुसमाडे , सुदाम भांड, सूर्यभान गडाख, बाबासाहेब शेटे यांची नावे चर्चेत असून कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
१९ जुन रोजी देवळाली प्रवरा सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी आ.चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखालील देवळाली प्रवरा विकास मंडळाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश संपादन केले. तर विरोधी लोकसेवा मंडळाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान उद्या रविवारी सकाळी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली निवड केली जाणार आहे.
देवळाली सोसायटी चेअरमन पदासाठी जुन्यांना संधी न देता सर्वाधिक मताने विजयी झालेले व दिवंगत माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांचे सुपुत्र संतोष चव्हाण यांच्या नावाची जोरदारपणे चर्चा सुरू आहे. याशिवाय उत्तम मुसमाडे, सुदाम भांड, बाबासाहेब शेटे, सूर्यभान गडाख तसेच बिनविरोध निवडून आलेले सुधीर टीक्कल यांची नावे चर्चेत आहे. व्हॉईस चेअरमन पदासाठी संगीता वाळुंज, स्वरूपा कदम, मंजाबापू वरखडे यांची नाव पुढे आली आहेत. माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी अंतिम केलेल्या संचालकास चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची खुर्चीचा बहुमान मिळणार आहे. ऐनवेळी सोसायटीत चेअरमन पदावर काम केलेले व यंदाच्या संचालक मंडळात निवडून आलेले शहाजी कदम, राजेंद्र ढुस, दिलीप मुसमाडे यांची नाव पुढं येऊ शकतात.
चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदी कोणाला संधी मिळणार हे उद्या ११ नंतर स्पष्ट होणार आहे.
सुधीर टीक्कल यांना संधी मिळावी!
देवळाली सोसायटी निवडणुकीत भटक्या विमुक्त प्रवर्गातून बिनविरोध निवडून आल्यानंतरही शेवटपर्यंत प्रचारात सक्रिय राहून विकास मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांसमवेत हाऊस टू हाऊस पिंजून काढणारे संचालक सुधीर विठ्ठल टीक्कल यांची चेअरमनपदी निवड करावी अशी मागणी अल्पसंख्याक समाज बांधवातून होत आहे.
तज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?
देवळाली सोसायटीच्या विजयानंतर माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी निष्ठावंताना तज्ञ संचालक म्हणून प्रत्येक वर्षी संधी देणार असल्याचे आभार सभेत जाहीर केले. त्यामुळे अनेकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार असून उद्याच्या निवडीनंतर काही दिवसांनी तज्ञ संचालकांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत