एसबीआय संजीवनी फिरता दवाखाना दुर्गम भागातील रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरेल- निंबराज मोहळकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एसबीआय संजीवनी फिरता दवाखाना दुर्गम भागातील रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरेल- निंबराज मोहळकर

  राहुरी(प्रतिनिधी) भारताच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय सेवांपासून वंचित असणाऱ्या ग्रामीण दुर्गम आदिवासी वाड्यावर आरोग्य सेवा पोहोचविण्यास अनेक ...

 राहुरी(प्रतिनिधी)



भारताच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय सेवांपासून वंचित असणाऱ्या ग्रामीण दुर्गम आदिवासी वाड्यावर आरोग्य सेवा पोहोचविण्यास अनेक अडचणी येत असतात डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर स्वप्नील माने आणि त्यांची सर्व सहकारी "साई ज्ञानेश्वरी" शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण दुर्गम आदिवासी वाड्यावर समर्पित भावनेने आरोग्य सेवा पुरवत आहेत त्यामुळेच एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून एसबीआय संजीवनी या योजनेअंतर्गत सर्व सोयींनी सुसज्ज एसबीआय संजीवनी क्लिनिक ओन व्हील्स या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करताना आम्हाला अति आनंद होत आहे असे गौरवद्गार भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री निंबराज मोहोळकर यांनी काढले.

            कार्यक्रमासाठी व्यासपीठावर निंबराज मोहोळकर साहेब विभागीय व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक श्री राव साहेब क्रेडिट हेड भारतीय स्टेट बँक,श्री दत्तात्रय कुठे शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी डॉ.स्वप्नील माने अध्यक्ष डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले CSR फंडींग मधील नामवंत तज्ञ डॉ.माने मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त दादा सरगर उपस्थित होते.

 मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून एसबीआय क्लिनिक ऑन व्हील्स या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.

           आज १ जुलै  भारतीय स्टेट बँकेचा स्थापना दिवस असून देशभरातील विविध राज्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून डॉ.माने मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ स्वप्निल माने हे ग्रामीण दुर्गम आदिवासी वाड्या वस्तीवरील आरोग्य सेवा देत असल्याने महाराष्ट्रात सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील एसबीआय संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स उपक्रमासाठी डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन ची निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

स्टेट बँक राहुरी शाखा व्यवस्थापक श्री दत्तात्रय कुटे साहेब यांनी डॉ.माने मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. स्वप्नील माने  करीत असलेल्या रोग्नेसेवेचा गौरव करून या निवडीबद्दल एसबीआय संजीवनी मार्फत थेट तळागाळातील गरजू रुग्णांपर्यंत जलद गतीने आरोग्य सेवा पुरवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        प्रास्ताविक करतांना डॉक्टर स्वप्नील माने म्हणाले की डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन च्या वतीने आजपर्यंत केलेल्या रुग्णसेवेचा त्याचप्रमाणे ३४२ साई ज्ञानेश्वरी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण,दुर्गम, आदिवासी भागात जाऊन रुग्ण सेवा देऊन ७६००० रुग्णांची तपासणी ६००० ऑपरेशन्स गरजू रुग्णांचे केलेले आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खेडोपाडी जाऊन आरोग्य शिबिरे घेऊन गरजू रुग्णांची सेवा पुरवली असून भविष्यात देखील गरजू रुग्णांना एसबीआय फाउंडेशनच्या एसबीआय संजीवनी व डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.

  या कार्यक्रमासाठी भिमाशंकर माने, डॉ.माने मेडिकल फाउंडेशनचे सीईओ जॉर्ज मगर, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे,एसबीआय संजीवनी समन्वयक मनोज केदारी डॉ.महेश वाळके,नारायण निमसे,सुरज विटनोर,कैलास खंडागळे,आकाश सगळगिळे, अशोक गडदे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत