आरपीआय आंबेडकर गटाचा उद्या अहमदनगर येथे जिल्हा मेळावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय आंबेडकर गटाचा उद्या अहमदनगर येथे जिल्हा मेळावा

राहुरी/वेबटीम:- आरपीआय आंबेडकर पक्षाच्या  राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  दिनांक ३ जुलै रोजी अहमदनगर नगर येथे जिल्हास्तरीय बैठक व मार्गदर्...

राहुरी/वेबटीम:-


आरपीआय आंबेडकर पक्षाच्या  राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  दिनांक ३ जुलै रोजी अहमदनगर नगर येथे जिल्हास्तरीय बैठक व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिली.


आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे दिनांक ३ जुलै रोजी दुपारी  पदाधिकारी बैठक व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने अनेक नेते व कार्यकर्त्यांचे आरपीआय आंबेडकर पक्षात प्रवेश होणार आहे.


या बैठकीस राज्य कार्याध्यक्ष  बाळासाहेब पवार, तान्हाजी मिसळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, सचिव महेश सुराडकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, जितू पाटोळे, संपर्कप्रमुख रोहित आव्हाड, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भालेराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.


 या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, पारनेर तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, नेवासा तालुकाध्यक्ष अमोल मोरे, राहाता तालुकाध्यक्ष सनी बनसोडे,पारनेर युवक तालुकाध्यक्ष अजय साळवे, संगमनेर तालुकाध्यक्ष संतोष  घगडमल, अकोले तालुकाध्यक्ष विजय पवार,अहमदनगर  युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, शहराध्यक्ष हरिष आल्हाट, संघटक दिनेश पलगडमल, प्रतीक खरात, सागर ब्राम्हणे, रमेश पलघडमल,  लखन वाघमारे, महेंद्र भोसले, प्रतिक रुपटक्के, अनिल ब्राम्हणे गौरव ब्राम्हणे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत