कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव नगर पालिका स्वच्छता विभागाने सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधनांचे वाटप करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्र...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव नगर पालिका स्वच्छता विभागाने सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधनांचे वाटप करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, सद्या पावसाळा सुरू झाला आहे कोपरगाव नगर पालिकेच्या स्वच्छता विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत पावसाळ्यात गटारी तुंबने,अनेक ठिकाणी गाळ साचने,कचऱ्यात साप बसलेले असतात असे प्रकार होत असतात
नगर पालिका सफाई कर्मचारी याना गमबूट,हॅन्ड ग्लोज,पावसाळ्यात रेनकोट पुरवठा करत असते.मात्र कोपरगाव नगर पालिकेचे बरेच कर्मचारी काम करत असताना या सुरक्षा साधनांचा पुरवठा न केल्यामुळे गमबुट व हॅन्ड ग्लोज तसेच रेनकोट शिवाय काम करताना दिसतात त्यामुळे स्वच्छता कर्मचारी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते
त्यामुळे कोपरगाव नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना त्वरित सुरक्षा साहित्याचे वाटप व्हावे असे या पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत