देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील शाह दावल मलिक बाबा दर्ग्याचे सर्वेसर्वा हजरत अकिलबाबा पटेल यांच्या मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठाणच...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील शाह दावल मलिक बाबा दर्ग्याचे सर्वेसर्वा हजरत अकिलबाबा पटेल यांच्या मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने बुधवार, दि. १३ जुलै २०२२ रोजी गुरुपौर्णिमा निमित्ताने देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व ऊर्दू शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले,
यानिमित्ताने प्राथमिक शाळेचे सौ. देशपांडे मॅडम व ऊर्दू शाळेचे पश्री. असिफ शेख सर व दोन्ही शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रतिष्ठाणचे संस्थापक हजरत अकिलबाबा पटेल यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले, की ईश्वराने आम्हाला सुंदर जीवन दिले, दुसऱ्याचे दुःख वाटून घेणे म्हणजे साक्षात ईश्वराला प्रसन्न करने, या जीवनाचे उपयोग समाजातील दु:खीत, पिडीत, गरजवंत कुटुंबासाठी व त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणे म्हणजे माणूसकी होय, जात, धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्य करणे म्हणजेच मानवता होय, आज अनेक गुणी विदयार्थी आहे परंतू परिस्थिती आभावी शिक्षण घेऊ शकत नाही, परंतू ईश्वर कृपेने व मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठानच्या व खादीम कमिटी कायमच श्रद्धा, प्रयत्न व सातत्य यामुलमंत्रा प्रमाणे कायमच तत्पर असेल,
तर याप्रसंगी महाराष्ट्रभर शिवरायांचे विचार समाजामध्ये प्रबोधनरुपी रुजवणारे शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी उपस्थित विदयार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांना गुरुपौर्णिमे निमित्ताने जीवनातील प्रेरणादायी भाषणाने मंत्रमुग्ध केले तर साक्षात शिवकाळातील शिवरायांच्या अपरिचित इतिहासाला उजाळा दिला,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हजरत शाहदावल मलिक बाबा दर्ग्याचे सर्व खादीम कमिटी जानमहंमद शेख, बाळासाहेब जोशी, जावेद तांबोळी,मुरलीधर तांबे, शरद टेकावडे,रशीद सय्यद, आप्पासाहेब शेटे, डॉ.प्रशांत नालकर,जावेद शेख,सचिन नालकर, रवींद्र पेरणे, रमेश गाढे, यांनी परिश्रम घेतले,
तर उपस्थित मुसाबाई शेख, शाकीर तांबोळी,अय्यूब शेख, हाजी शेख सहाब, हाजी मन्सूर शेख, हाजी नबी, सुभेदार शेख,रऊफ शहा, बाबाजान शेख, गफ्फार शेख, सिराज सय्यद, मौलाना अबूबकर निजामी, उमर इनामदार, मौलाना रियाज आदी मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य व परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात समीर माळवे यांनी हजरत अकिलबाबा यांच्या त्यागमय जीवनाला स्पर्श करून गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत