पाटण(वेबटीम) पाटण तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून अनेक गावांवर भुस्खलनाची टांगती तलवार आहे. गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार...
पाटण(वेबटीम)
पाटण तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून अनेक गावांवर भुस्खलनाची टांगती तलवार आहे. गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भुस्खलन, दरड कोसळणे, आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी ५ गावातील ८० कुटुंबातील ३१० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पाटण येथील प्रशासनाचे अधिकारी अॅक्टिव्ह होऊन नागरिकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहेत. आपत्तीग्रस्त ठिकाणी राहुरी तालुक्यातील कणगर येथील भूमिपुत्र तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी आपल्या टिमसोबत भर पावसात, ओढे नाले पार करून वेळप्रसंगी चालत जाऊन उपाययोजना राबवत आहेत. परिषद शाळेत स्थलांतरित केले याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पावसाने जोर धरला आहे. गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा अनुभव घेता पाटण प्रशासनाने सुरवातीलाच खबरदारीचा उपाय पुर्वनियोजन केले आहे. खबरदारी म्हणून पाटण तालुक्यातील प्रशासनाकडून ३१० जणांना सुरक्षित स्थळी हलविले.
पाटण तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून अनेक गावांवर भुस्खलनाची टांगती तलवार आहे. गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भुस्खलन, दरड कोसळणे, आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील कणगरचे भूमिपुत्र सुनील गाडे हे या भागात प्रांताधिकारी म्हणून कार्यरत राहत आहे.गाडे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत भर पावसात, ओढे नाले पार करून पायी चालत जाऊन उपाययोजना राबवत आहेत. गाडे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कुटुंब स्थलांतरित करण्यासाठी स्वता भर पावसात उतरून केलेल्या कार्यामुळे तेथील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. प्रांताधिकारि सुनील गाडे हे कणगरचे भूमिपुत्र असून त्यांच्या कार्याची राहुरी तालुक्यात सर्वत्र वाहवा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत