राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- पंढरपूर यात्रा व आषाढी एकादशी निमित्त राहुरी फॅक्टरीतील श्री.शिवाजी प्राथमिक विद्यालय शाळेच्या वतीने शिस्तबद्ध व ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
पंढरपूर यात्रा व आषाढी एकादशी निमित्त राहुरी फॅक्टरीतील श्री.शिवाजी प्राथमिक विद्यालय शाळेच्या वतीने शिस्तबद्ध व सुरेख बालदिंडीचे आयोजन केले गेले.
शाळा परिसर ते कारखाना वसाहत मधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असा दिंडीचा मार्गक्रम होता.या बाल वारकरी दिंडी मध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंद बरोबरच सर्व मुले - मुली यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून,कपाळी टिळा, हाती टाळ व भगवा झेंडा,मुलांनी मस्तकी टोपी,मुलींनी मस्तकी तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल-रुक्मिणी यांच्या पालखीसह,टाळ-मृदंग-साउंड-सिस्टीम यांच्या साथीने विठुरायाच्या नामघोषात ठेका धरत,ठिकठिकाणी रिंगण करून त्यात फुगड्या खेळत जल्लोषात भागवत संप्रदायाचा हा पारंपरिक वारसा पुढे नेला.
जाधव सर व देशमुख सर यांनी भजन म्हणत दिंडीचा उत्साह कायम ठेवला.विठ्ठल-रुक्मिणी, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई, एकनाथ-नामदेव-तुकाराम यांच्या वेशात विद्यार्थ्यांनी भूमिका बजावल्या.
पंचक्रोशीतील भाविकांनी ठिकठिकाणी त्यांचे पूजन करत या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक देखील केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आवारे मॅडम यांची प्रेरणा,व जाधव ए. के.सर,देशमुख सर,राशीनकर सर,जाधव के.के.सर,सोनवणे सर,इंगळे सर,थोरात सर,आयनर मॅडम,कोहकडे मॅडम,साबळे मॅडम,डांगे मॅडम,शेटे मॅडम या सर्वांची मेहनत,तसेच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या सर्व बाल वारकऱ्यांना श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूटचे प्रोप्रा. श्री.आंबेडकर सर यांनी स्वेच्छेने बिस्कीट पुडे देऊन बालगोपाळांचा आनंद द्विगुणित केला.सर्व पालक वर्गाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत